कविता – 🌷 ” रिक्त मूठ “


कविता - 🌷 " रिक्त मूठ "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

नदी, झाडं, भूमीं निरंतर आपणांस सर्वस्व बहाल करतात
कसलीच अपेक्षा न करता, दुसऱ्यांसाठी आयुष्य वेचतात

जीवनात पुण्य-संचय करण्यासाठी तत्पर राहायलाच हवं
अन्यथा येथे असं काहीहि नाही, जे स्वतःबरोबर नेता यावं

नाम, किर्ती, पैसा, नाती, जमिन-जुमला सगळंच मागं राहतं
सोडून जाताना, रिक्त हातांच्या मुठीत फक्त पुण्य राहू शकतं

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!