कविता - 🌷 ' राधेय-कर्ण '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
दैव गतीने एका निपुत्रिक जोडप्याला,
दैवानं पाठविलेला, खजिना सापडला
पाण्यावर तरंगती, सुबक पेटी दिसता
त्या दोघांचा आनंद गगनातही मावेना
देवाचे अनंत लक्ष कोटी ऋण मानून
त्या राजबिंड्या अर्भकास घरी नेऊन
रात्रीचा दिवस करुन त्यास मोठं केलं
त्याला शिकवलं, स्वतः खस्ता खाऊन
दैववशात राजमहाला- ऐवजी साध्याशा
सारथ्याच्या चंद्रमौळी घरी कर्ण वाढला
आईचं वात्सल्य- प्रेम राधेकडून मिळालं
म्हणून त्यास "राधेय-कर्ण"हे नाव पडलं
जन्मरहस्य समजूनही नाव'राधेय-कर्ण'हे,
त्याला अधिकच प्रिय-अभिमानास्पद वाटे
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply