कविता -🌷 ” रंगात रंग मिसळूनी “


कविता -🌷 " रंगात रंग मिसळूनी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

ऋतुराज वसंतऋतू जणू खेळतो रंगपंचमी
श्रावणमासी सप्तरंग उधळी इंद्रधनुष्यातुनी...

भल्या पहाटे, सांजवेळी रंगपंचमी ती गगनी
तारांगणीच्या सम्राटाचीच साम्राज्य निशाणी...

गोकुळ नगरी गजबजलेली, गोप-गोपिकांनी
रंग-खेळी-कान्हा रंगात-ओली राधेची-ओढणी...

आभाळातुनी रिमझिम, सोनसळी उन्हातुनी
रंगी-बेरंगी-उधळण, बहर फुलां-फुलां-मधुनी...

जणू अवघीं सृष्टी-देवता, खेळतेय् रंग-पंचमी
स्वर्ग-अवतरला-पृथ्वीतलावर तन-मन आनंदी...

क्षणभर विसरून हेवे-दावे, क्षणभंगुर-जीवनी,
रंग-उधळूया रंग-खेळूया, रंगात-रंग-मिसळूनी...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!