कविता :🌷 ” योग-तपश्चर्या “


कविता :🌷 " योग-तपश्चर्या "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

अष्टांग-योग-साधना, अवघ्या आयुष्याची आराधना...
तन-मन-धन अर्पण करूनच पूर्ण होती मनोकामना
तपस्या असली खडतर, अडथळे आले तरी बेहत्तर...
सोडायची ना व्रताची कास हा"बीज-मन्त्र"असे खास...

एका रात्रीत न बनलं"रोम",न-खचता-ठेवला-जर-जोम...
न माजवता अवास्तव स्तोम, नित्य अनुलोम-विलोम...
लक्ष केंद्र एकच बिंदू ,न असावा मनी किंचितहि किंतू...
जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा तेव्हा घडते एखादी "सिंधू"...

योग-आसनाने तना-मनात, अति-सूक्ष्म लहरींचं स्पंदन...
निरोगी देही ब्रह्मारंध्रापासून तरलतम-कंपनांचं संचलन...
नखशिखांत होतसे पराकोटीच्या उत्तम ऊर्जेचा झंकार...
षट् चक्रातून निर्माण होईल प्रणव-नादाचा पवित्र हुंकार...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!