कविता – 🌷 ‘ या सुखद “निर्मल” वळणावर ‘

कविता - 🌷 ' या सुखद "निर्मल" वळणावर '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख -  गुरूवार, ४ मे २०१७

मन तुडुंब-तुडुंब, भरलंय् काठो-काठ  ...
बहुधा हीच असावी ती पाऊल-वाट ...

जणू स्वर्गातील हीच ती सोन-पहाट  ...
आकंठ आनंद भरुनी वाहतो अफाट ...

काही-बाही विचारांची येरझारा नाही ...
चिंतेचाही लांब-लांबवर लवलेश नाही ...

निर्विचार, स्थिर, सुशांत मनाच्या-डोही,
कसलीही हालचाल वा कल्लोळ नाही ...

सर्वत्र निरव अशी शान्तता सुखावणारी ...
अंतरी वा देही अंतर-बाह्य फरक नाही  ...

सुरेख, निळंशार, अथांग-अनंत-आभाळ ...
लोभसवाणं जणू खुणावणारं मोह-जाळ ...

आयुष्याच्या या सुखद "निर्मल"वळणावर
देहभान विसरुन मन "सहजी"स्थिरावणार

🌷@तिलोत्तमा विजय लेले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!