कविता – 🌷 ” मोहक स्वप्नं त्या दोघांची “… तारिख – २७ सप्टेंबर २०१६

तारिख -२७ सप्टेंबर २०१६
कविता – 🌷 ” मोहक स्वप्नं त्या दोघांची “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
आटपाट शहरात एक असतो तो …
अन त्याच शहरात एक असते ती …
तो असतो उंच-निंच देखणा छान …
ती नाकीडोळी नीटस, गोरीपान …

पहिल्या-वहिल्या नजर-भेटीत …
दोघे एकमेकांचे होऊन जातात …
मग मात्र जरा उतावीळ होतात …
शुभलग्न-मुहूर्ताची वाट बघतात …

शेवटी एकदाचा इंतजार संपतो …
चांगला लाभणारा मुहूर्त निघतो …
लग्नाचा शुभ-दिवस उजाडतो …
अन विवाह-सोहळा आरंभ होतो …

गौरीहार-पूजनाच्या वेळी, 
” तिच्या ” मनातील भाव-तरंग …

सनई-चौघड्याचे मिश्र-सूर …
हृदयी सम्मिश्र कालवा-कालंव …
सुख-दुःखाच्या भावांचं अनोखं मिश्रण …

ओठावर हसू अन मनी हुरहूर 
अंतरी ख़ुशी पण डोळ्यांत गहिवर …
नेत्रातून संतत पाण्याचा पाझर …
आनंदाश्रूं-वियोगाश्रु वाहती झरझर …

एकीकडे वाटे मिलनाची अपार ओढ …
दुसरीकडे आप्तांचा अचानक वियोग …

विवाह सोहळा संपन्न होतांना
“त्याचं ” तरल-भाव-विश्व…

आज माझ्या आयुष्याचं पूर्णत्व …
इतके दिवस दैव पाहत होतं सत्व …
पण न ढळू दिलं मी माझं स्वत्व …
यापुढं तिच्याच साथीचं फक्त महत्व …

तो व ती स्वतःच्या मनो-विश्वात दंग …
विधी सर्व होतात लग्नाचा-प्रसंग …
आतूर मात्र असतात एकांतीचा संगं …
गोड थट्टेनं दोघांच्या गाली चढे रंग …

मनोमन रंगवलेली स्वप्नं साकारताहेत …
मोहक, हळुवार भावना प्रकटताहेत …
जणू अवघ्या दुनियेत दोघेच उरलेत …
“हनिमून”च्या विचारात हरवले आहेत …

कुणीतरी हलकेच भानावर आणतं त्यांना …
नमस्कार करीत सुटतात जोडीनं सगळ्यांना …
आशिर्वाद हवेतच भर-भरून त्या दोघांना …
अति-उत्सुक त्यांचं रंगीत स्वप्नं साकारण्या …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!