कविता : 🌷’ मुख्य भान ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवारी, २७ एप्रिल २०२३
वेळ : १ वाजून ४०
‘सुख सुख’ म्हटलं तर ते नेमकं असं काय हवं असतं ?
खरं म्हणाल तर सारं सारं काही अंतरीच नांदत असतं !
जन्मतःच अति-सूक्ष्म-अति-तरल-अंतरात्मा हृदयी असतो
हृदयांतरीचा सुप्त असा तो ईश्वरीय-अंश हसवतो-खुलवतो !
लडिवाळ-निष्पाप बालपणात त्वरित टिपून घेतो सर्व काही
मनाची पक्की जडण-घडण होते माऊलीच्या सुसंस्कारांनी !
निरागस मैत्री-सहकार्याचे संस्कार सतत घडतात बालवाडीत
शालेय-जीवन पैलू पडून जणू रुपांतरित होतं दगडातून मूर्तीत !
महाविद्यालय-प्रशिक्षण कामी येतं, नोकरी मिळवण्यासाठी
स्वतःच्या पायांवर ठाम उभे, कौटुंबिक-कर्तव्य-पालनासाठी !
या संपूर्ण प्रवासात ‘माणूसकीनं कसं जगावं’ याचं मुख्य भान,
ज्याला-त्याला आपापल्या परीनेच कमवावं लागतं त्याचं ज्ञान !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply