तारिख – सोमवार, २१ फेब्रुवारी २०१७
कवितेचं नाव-🌷” मुक्काम पोस्ट रामेश्वरम् “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
खूपच जुनी गोष्ट आहे आजची …
रामेश्वरमला गेलो होतो तेंव्हाची …
एक वर्षी ” अहो आईना ” घेऊन,
त्यांच्या इच्छेनुसार,रामेश्वरम् केलं …
मुंबईहून विमानाने गेलो,कोयम्बतूरला …
कार हायर करून,पुढं,गेलो रामेश्वरमला …
खूप सुंदरसं ठिकाण,मंदिराच्या जवळचं,
एक छानसं हॉटेल सर्वांत जास्त आवंडलं
मस्त समुद्र-किनारा, स्वच्छ मऊ रेत …
नारळी-पोफळीची झाडं,निसर्ग मस्त …
खायला टेस्टी,साऊथ-इंडियन पदार्थ
आल्हाद-दायक हवामान,सुंदर गार्डन
फुलांनी डवरलेली वेली-झाडं-झुडूपं …
एकूण,निसर्ग-सौंदर्य फार उत्कृष्ट होतं …
बाहेरच्या बाजूलाच,झुलायला हॅमॉक्स …
मोठा,स्विमिंग पूल,कंफी-गार्डन-चेअर्स,
साईड-टेबलवरून, खात-पीत वाचन …
मस्त तब्बेतीनं, प्रत्येक क्षण,आनंदानं …
सर्वप्रथम स्नान केल्याने, तन व मनं …
झालं होतं एकदम मस्त ताज-तवांनं …
नंतर समुद्रावर मारली एक चक्कर …
नवरोजी हॉटेलवर आराम करणार …
मग मी, सासूबाई, दोन लहान मुलं,
अन हे मोठं-थोरलं, पूजेचं-साहित्य …
अशी वरात हलत-डुलतच आली …
शिवमंदिराच्या मुख्य-प्रवेश-द्वारी …
येथवर ठीकच होतं, सगळं काही …
दगडी, भक्कम, अति-भव्य प्राचीन मंदिर …
दगडीच जाड-जूड खांब, भिंती व जमीन …
तिनं सासूबाईंचाच धरलेला एक हात …
त्यांना डायबेटिसमुळं कमी दिसायचं …
दुसऱ्या हातांनं, पूजेचं-साहित्य,धरलं …
दोन्ही मुलं,तेव्हा लहान असल्यामुळं
चालत होती,तिला चिकटून-चिकटून …
मुख्य-प्रवेश-द्वारी व मंदिराच्या आवारात,
प्रचंडं चिखल व ओला निसरडा फ्लोअर …
सर्वच साऊथची भक्त- मंडळी,
ओली, समुद्रात मारुन बुचकळी, …
मग ओलेत्यानं दर्शनास,आलेली …
त्यांच्या डोक्यावर, अंगावर किलो-भर तेल …
त्यांच्या,अंगावरून निथळणाऱ्या पाण्यातून,
तेल मिश्रित पाणी खाली पडून,थारोळं झालेलं…
दगडी फ्लोअरवर,तेलाच्या तवंगामुळं,निसरडं …
मुख्य-प्रवेश-द्वारा-पासून गाभारा होता,
प्रशस्त मंदिरा-समान,प्रचंड लांबच-लांब
तिच्या पोटात, भीतीनं गोळाच आलेला …
स्वतःला, वयस्क- सासूबाईंना,
अजाणत्या कोवळ्या मुलांना,
अन सर्व पूजेच्या-साहित्याला …
या निसरड्यातून इतकं मोठं अंतर,
कापून,सुरक्षितपणे कसं बरं न्यायचं …
मनातल्या-मनात तिनं त्या,
रामेश्वरालाच साकडं घातलं …
” बाबारे,या गतीनं आम्ही,”
“पडलो-बिडलो नाही तरी,”
“चार-पाच तासांनी पोहोचू “…
“तूच,आता कर काही जादू “…
कमाल-धम्माल-जादू यानंतरची,
ती बनेल आपली कविता उद्याची …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏�🌅🕉🌷🙏
Leave a Reply