कविता : 🌷” मानस-वारी “


कविता : 🌷" मानस-वारी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

एकाच स्थितीमध्ये चित्त, मन, शरीर, बुद्धी कंटाळते
विरंगुळा म्हणून स्थिती बदलायला धडपडत असते
कधी हवा-पालट म्हणून थोडी गंमत, हवीशी वाटते
कधी तीर्थ-क्षेत्र-दर्शन-यात्रेची आतुरता वाटत असते

आषाढी एकादशीला पंढरपूरला भक्तिभावाला पूर येतो
भारतभरातून सर्व स्तरांतून भक्त-समूह पायी-पायी येतो
लाखोंच्या संख्येने नाचत-गात 'स्व'चे भान विसरुन येतो
स्त्री-पुरुष-आबाल-वृद्ध-शेजारी-पाजारींच्यासह पोहोचतो

ज्या ज्या कुणाला तीव्र इच्छा असूनही ती मारावी लागते,
त्यांचे फक्त शरीर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असते,
मन मात्र दिवस-रात्र वारकरी संप्रदायाबरोबर फिरत असते
पंढरपूरी विठ्ठल-रखूमाईच्या दर्शनासाठी आसुसलेले असते

मनात तीव्र इच्छा असता 'मानस'-यात्रा सहजच घडू शकते
त्यासाठी आंतरिक ओढ-खरी तळमळच फक्त जरुरी असते
मनस्वी-ओढीने सूक्ष्म-शरीर जगाच्या पाठीवर पोहोचू शकते
कैलास मानसरोवर यात्रा करुनही-पंढरपूरची-वारी पूर्ण करते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!