कविता - 🌷 " मातृत्व "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
किती झालंय हे मन वेडं असं दोलायमान
जणू झुलतंय हिंदोळ्यावर ते पिसा-समान...
घटकेत येथे,तर घटकेत तरंगतंय ते हवेवर...
घुमून-फिरुन मुलांकडेच झेप घेत वरचेवर
मनालाही ओढ तिकडे, मुलांचीच लागलेली
कामांच्या वेढ्यात,चांगलीच ती गुरफटलेली
हो-ना करता-करताच, शेवटी निर्णय घेतला...
कामांना पारच नाही-जमतील तेवढीच करा
पुन:-पुन्हा अंतर्मनाचा कल कसून तपासला
तरी अंतिम निर्णयावरच शिक्कामोर्तब झाला...
कितीही महत्त्वाची कामं खोळंबली असूनही
सिध्द झालं,मातृत्वापुढे महत्त्वाचं काही नाही
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply