कविता : 🌷“ माणूसकी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शुक्रवार, १८ जुलै २०२४
हल्लीच एक छानशी गोष्ट वाचनात आली
कथा अत्यंत वास्तववादी आणि ओघवती
मानवी स्वभावाचं अगदी यथार्थ प्रतिबिंब
चांगुलपणाच्या स्तुती-सुमनांनी होती चिंब
कुणालाही वाईटपणा पदरी नको असतो
"परस्परा पावणे बारा"असं वागत असतो
श्रेय नामावलीत स्वतःचं घोडं दामटवणार
दोषांचे खापर मात्र दुसऱ्यांवरच फोडणार
सत्य आणि असत्य यांत गुंतणारच नाहीत
अलिप्त राहून त्या फंदात पडणार नाहीत
जरा कुशंका आली प्रकरण अंगाशी येईल
स्वतःला वाचविण्यास कित्येक सोंगं घेतील
स्वार्थाने अंध-होऊन "ध चार मा"ही करतील
देहाने मनुष्य असूनही राक्षसी-कृत्य करतील
एवढं करुन-सवरुन साळसूद बनून फिरणार
अशा दांभिकांना "माणूसकी" कधी कळणार?
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply