कविता - 🌷 " महिमा रथ-सप्तमीचा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
ॐ नमस्ते रुद्ररूपाय रसानां पतये नम:।|
ऊँ घृणि सूर्याय नम:| वरुणाय नमस्तेअस्तु||
दिवस हा रथ-सप्तमीचा, अति-महत्वाचा
हा सुदिन आहे सूर्य-देवाच्या आराधनेचा,
त्याची फलश्रुती मिळते, ही एकवाक्यता
आज तिथी आहे माघ-महिन्याची-सप्तमी
सूर्य-जन्मामुळे ती साजरी होते"सूर्यजयंती"
काही ठिकाणी म्हणतात "अचला सप्तमी"
शुभ-आकडा-सात, ही पूर्वापासून-मान्यता
सूर्याचे-सूक्ष्मस्तरीय-सत्वगुण रथसप्तमीला
कैक पटीने अधिक कार्यक्षम होत असतात
तीस प्रतिशत अधिक ते होतात प्रभावशाली
त्यामुळे सूर्योपासना ३०%ने अधिक प्रभावी
अध्यात्मिक कक्षाआलेख उंचावून फलप्राप्ती
सूर्य-लोकी, सात-घोड्यांचा असतो सूर्य-रथ
सप्तलोकी-त्याचे भ्रमण-नक्षत्रलोक-ग्रहलोक
भुवलोक-नागलोक-स्वर्गलोक-अन्-शिवलोक...
रथ-सप्तमीला सूर्योपासना अधिकच फळते...
सात-तऱ्हेच्या पापांचे संपूर्णपणे नाशन होते...
त्यामुळे या दिवशी, आत्म-तेजोपासना घडते...
सूर्याची सूक्ष्म-किरणं, पृथ्वीच्या कक्षा भेदून,
भूतलावर प्रत्यक्ष वायू-मंडलात अवतरतात
भूवरी, तेजोमय-वातावरण-निर्मिती-करतात...
म्हणूनच आज रथ-सप्तमीच्या शुभ दिनी,
संक्रमण-सोहळा संपुष्टात आला असूनही
सूर्य उपासनेद्वारे शक्य प्रगती, शत पटींनी...
सक्रिय-सद्-विचारांचं संक्रमण, न थांबवता,
स्वच्छ-मन-वाणी-व्यवहार-आचार-विचारांनी,
सूर्योपासनेने अद्भुत उन्नतीच होते सर्वतोपरी...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply