कविता – 🌷 ‘ महा-सोमदेव-दर्शन ‘

कविता - 🌷 ' महा-सोमदेव-दर्शन '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, १९ एप्रिल २०२४
वेळ - रात्री, ११ वाजून ३५ मि.

चंदामामाविना बाल्यावस्था आहे अपूर्ण
बाळांना-मोठ्यांनाही त्याचंच आकर्षण ...

सगळी बच्चे कंपनी होते खुश त्या पाहून
गोल-गरगरीत-चांदोबा अन् त्याचं चांदणं ...

महाबळेश्वरला झालेली ही गोष्ट विलक्षण ...
पौर्णिमेच्या दिवशीच श्री सोमदेवाचे-दर्शन

सुमारे चार वाजता भल्या पहाटे-पहाटे,
जणू साद मज घातली पुनवेच्या पूर्णेंदूने ...

स्वप्नामध्ये मिटल्या डोळ्यांनी जे दिसले,
हुबेहूब तेच जागे-पणी, प्रत्यक्षात दिसले ...

घराच्या बाहेरच बागे-मध्ये अति-विशाल ...
खुणावे जणू पसरवूनी दिव्य मोह-जाल ...

लख्खं-तेजपुंज असे महा-सोमदेव-दर्शन  ...
जन्मभरात तो देखावा अशक्यच विसरणं ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!