कविता – 🌷 ” महती “


कविता - 🌷 " महती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

तिच्या औषधी-गुणधर्मांनी,
पूर्ण विश्वात केला दबदबा
तिच्यातील सात्विक गुणांनी
आठवते "तुकोबांची गाथा" !

नसूनही आगळे रंग वा रुप,
नसूनही फुले सुंदर देखणी...
तरीही दरेक श्वासा-गणिक,
कृष्णमय मंगल आठवणी !

जेथे पावित्र्य तेथेच ती रुजते...
असो वा नसो छानसं वृंदावन...
ती दारी असता मन भारावते...
सहजच पावन होते तन-मन !

कृष्ण-सुवर्णतुला पूर्ण झाली,
तुळशीच्या एका पाना निशी...
महती तिच्या औषधी-गुणांची,
कायम दरवळते दाही-दिशी !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!