कविता - 🌷 ‘ मन माझे ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
मन माझे
मन माझे मऊ मेणासारखे...
जिव्हाळ्याच्या ऊबेने,
वितळून जाणारे...!
मन माझे फुलपाखरा सारखे...
सुवासाच्या गोडव्याने,
फुला-फुलावर बागडणारे...!
मन माझे चातका सारखे...
सुखाच्या ओढीने,
तिष्ठत राहणारे...!
मन माझे पक्षासारखे...
वार्यासवे आकाशात,
झेपावत जाणारे...!
मन माझे कापसासारखे...
हलके-फुलके होऊन,
तरंगत राहणारे...!
मन माझे नदीसारखे...
खळखळ आवाजात,
सागराकडे धावणारे...!
मन माझे सागरतटा सारखे...
लाटांच्या तडाख्यात,
भक्कम ऊभे राहणारे...!
मन माझे असेही...
मन माझे तसेही,
शीड फाटल्यावरही,
होडी हाकून किनारा गाठणारे...!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply