
कविता - 🌷 " मन आभाळ-आभाळ "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
मन आभाळ-आभाळ
कधी शुभ्र, कधी निळं...
कधी भरून ते वाही,
कधी चांदण्यात न्हाई...
एकांत किनारा होता
तटाच्या अवतीभवती...
प्रहर अलौकिक होता,
सागराला आली भरती...
फुलापरि हळुवार मनही
खुदकन हसले- फसले...
एकेका श्वासा-मधूनी,
प्राजक्त होऊनी न्हाले...
वा-यातून झुळूझुळू मनात
गीतांचा सुगंधित ठेका...
कस्तुरी दरवळताना,
वाहे संगीत-नाद-सरिता...
पक्षी किलबिल करती
थिरकती मंजुळ स्वरात...
स्मृती अदृश्य असूनही,
दरवळला मोगरा मनात...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply