कविता – 🌷” मनोमनी मोगरा दरवळला “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख -८ नोव्हेंबर २०१६
साथीला, असं कोणी जे हवंहवंसं वाटतं …
अन टिपूर चांदणं असावं,वर आभाळात …
थेट स्पर्शी,थंडगार गुळगुळीत रेत पायाला
अन ओझरताच स्पर्श,हो अचानक हाताला …
गुद-गुल्या हो पायाला अन मनाला …
सरकणाऱ्या मऊ रेतीमुळे पायाला …
अन हलक्या हस्त- स्पर्शानं मनाला …
बीजलीचा ” करंट “जणू काही लागला …
झर्रकन स्पर्शून,गेला की हो तनं-मंनाला …
वेळ जणू दौडे,सशाच्या गतीनं
न कळे दोघा,कधी गेला पळूनं …
घड्यालाचे काटे,थोडे थांबणार चुकून …
दोघेही होती प्रसन्न,चांदण्यात फिरून …
रजनीचा प्रहर,शितल,मंद-पवन …
दोन आतूर जीव,अंधुकसं बंधन …
मनी भाव-अधीर,करण्या समर्पण,
निरव शांतता,आवाज फक्तं चांदण्यांचे …
मूक दोघे असूनही,बोलके भाव मनीचे …
चांद-रातीला,संगे तारा-तारका असता,साक्षीला …
नभी चंद्राचा,जादुभरा मंद-धुंदसा प्रकाश पडला
त्याच पिवळंसर उजेडात, ती दोघे
अवतार जणू,देखण्या रती-मदनाचे …
द्वाड वारा तिच्या पदराशी खेळे,
मधेच त्यास, वारा पदरात गुरफटे…
तिचे भुरुभुरु उडणारे केस सोडवतो
त्यां हळूच स्पर्शून, तो उत्तेजित होतो
ती लाजून चूर होता,तिच्याकडे पाहातो
न बोलताही,नजरच दोहोंची बरंच काही बोलते
निसर्ग-राणी जणू,मिश्किलपणे सर्व न्याहाळते
सागर-लहरींचं द्रुत-लयीतलं गाणं …
चंद्राचं हळूच ढगात जाऊन लंपणं …
किनाऱ्यावर पानांचं खुशीत सळसळणं …
दूरवर समुद्रात सुंदर होड्यांचं वलंहवणं
तो आणि ती,एकमेकां हळूच चोरून पाहती
नकळत एकमेकांकडे प्रेमाने,आकर्षित होती
बोलण्याची हिम्मत दोहोंत अजिबात,नव्हती
अखेरीस,देवदूत बनून,कुल्फीवाला येतो मदती
खाता-खाता,कुल्फी-सह ती ही पिघळते
त्याला उत्स्फूर्तपणे होकार देऊन टाकते
तो ही मग कुल्फीवाल्याला येऊन,खुशीत
” उपरका पैसा रहने दो “म्हणत देतो टीप
तेवढयात मोगऱ्याचा धुंद सुवास घेऊन
गजरे- वाला उभा समोर ” दत्त ” म्हणून
लगेच पुढे सरसावून, तो सहा – गजरे घेतो
तिच्या,लांब-सडक केसांवर हात फिरवतो
तिच्या केश-संभारावर तो प्रचंड फिदा असतो
ती हसुन पाठमोरी होते,तो मग गजरे माळतो
ओठी, मलई- कुल्फीची मिठास,
हृदयी जागें,प्रीतीची-मधुर-आस …
दोघांच्या मनोमनी मोगरा,बराच काळ दरवळतो
Leave a Reply