कविता : 🌷' मनाने जवळ '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
माझ्या-भावांत-चौथा-क्रमांक-आहे,किशोर-अण्णाचा
तेजस्वी गौर वर्ण-देखण्या-रुबाबदार-व्यक्तिमत्वाचा
मिरजेत-जुन्या-जीर्ण-घराचे-तुळया-छत-कोसळले
दैवी-कृपेने-अन्-आईच्या पुण्याईने, सर्वांना-वाचविले
तेंव्हा कि-अण्णा लहान होता-तो बाल-बाल बचावला
"देव तारी त्यास कोण मारी"याचा-जणू-प्रत्यय-आला
शाळेत-रींग-खेळताना-एक-डोळा-दुखावून-फूल-पडले
त्याची-दृष्टी-वाचविण्यासाठी-आईने-जंग-जंग-पछाडले
आईच्या समय-सूचकतेमुळे-वेळेवर-योग्य-उपचारांमुळे
कि-अण्णाच्या-डोळ्याचे-व-दृष्टीचे नुकसान-होणे-टळले
दादाच्या प्रयत्नांनी,सुरत-इंजिनिअरिंग-कॉलेजात-प्रवेश
तोडके-मोडके कामापुरेसे गुजराती, शिकला-विनाक्लेश
त्याआधी मात्र शब्दांच्या अर्थाविरुद्ध, हावभाव-करीतसे
वाढप्याला"आपो" म्हणत, हाताने "नको"खूण-करीतसे
किशोरअण्णा काहीसा मित-भाषी पण कुशाग्र-बुध्दीचा
बुध्दिनिष्ठ-कर्तव्यनिष्ठ-शांत, रसिकतेने-आस्वाद घेणारा
इंजिनिअरिंग-अभ्यासक्रम-पूर्ण-करुन-पदवी प्राप्त केली
लगेच-बृहन्मुंबई-महानगरपालिकेत नोकरीही मिळविली
प्रत्येक गोष्टीचे वेळापत्रकानुसार, योजनाबध्द आयोजन
प्रकल्प व्यवस्थापन दूरदृष्टी, निग्रहपूर्वक योग्य प्रायोजन
अत्यंत प्रामाणिक प्रयत्न, सरळ, यशस्वी कार्य-पध्दतिने
बीएम्सीमध्ये-"चीफ-इंजिनियर" हे अत्युच्च पद भूषविले
यश मिळविले पण कधी-स्वतःची-फुशारकी-मारली-नाही
सदैव सर्व सहका-यांना-बरोबर-घेऊनच, वाटचाल-केली
नात-नातू-पत्नी-जावई-दोन-गुणी-मुलींनी-जीवन-समृद्ध
स्वतः-कुटुंबाची-संपूर्ण-काळजी-घेण्यास-की-आहे-समर्थ
मनालीच्या लग्नात, पुढाकार-घेऊन-त्याने-देवक-ठेवले
भावातील-अतूट-स्नेह-बंधावर-जणू-शिक्कामोर्तब-केले
ऑफिसात मोठा-साहेब, तरी घरची जबाबदारी पेलणारा
भाऊ-बीज असो रक्षा-बंधन असो नक्की हजर राहणारा
अध्यात्मिक साहित्यात रूची, ज्ञान-लालसा पूरेपूर आहे
असा-"की-अण्णा"लांब-असूनही मनाने-जवळचा-आहे
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply