कविता – 🌷 ” मनं तुडुंब भरलंय “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – 23 नोव्हेंबर २०१६
कालचा दिवस काहीसा आगळा-वेगळा होता …
अपेक्षेनुरुप “आज” क्षणा-क्षणांनी जात आहे
उद्याचा सूर्य, शुभ-कारक सुखद असणार
प्रत्येक क्षण नवा-कोरा-करकरीत असणार
सृष्टीचं काल-चक्र अविरत फिरतच राहणार …
स्वतःचा एक स्वतंत्र चेहरा-मोहरा घेऊन,
त्याच्या आगळ्या-वेगळ्या अस्तित्वासह
शंभर टक्के तो खूप काही येणार घेऊन !
मी तीच, सूर्य तोच, निसर्ग सदा-बहार रमणीय …
कालचं झाकोळलेलं आभाळ पार नाहीसं झालं
कालचं गढूळ मन काही अंशी थोडंसं शांत झालं
स्वच्छ असा संधी-प्रकाश दाही दिशांना पसरलाय …
प्रत्येक क्षणी जसं सृष्टीचं रूप पालटत जातं …
क्षणो-क्षणी, आपलं भाव-विश्वं बदलंत जातं !
छानशा झोपेनंतर सगळं कसं ताज-तवांनं वाटतं
जसं,पावसाची सर पडून गेल्यावर वातावरण होतं
दिवाळीच्या दिवसात,अभ्यंग-स्नान करून वाटतं,
ताज्या-फराळावर ताव मारून, मस्त गप्पांत रमतं
झर- झर वाहणारा निर्झर …झुळु-झुळू वाहणारं वारं …
सळ-सळ करणारी झाडं …खळ- खळ वाहणारं जल …
सगळी नाद-दृश्य-चित्रं, मनास लावतात ओढ …
प्रकृतीनं निर्मीलेल्या, गोष्टी खास देतात जोड
नुकसान करी, मानवी-निर्मितीची स्वार्थी-खोड
अनंत-कोटी चुकांचं परिमार्जन …तूच करू जाणे जगत-नारायण
मनं तुडुंब भरलं आहे, कृतज्ञतेनं …हात जोडून आता एकच मागणं
नवीन चुका, पापं न व्हावी हातून …सदाचरणात जावो उर्वरीत जीवन
सद्कार्यच व्हावी यथाशक्ति हातून, प्रत्येक स्वरूपी व्हावं तुझंच दर्शन !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply