कविता -🌷" मदार "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
आयुष्य हीच सतत बदलत जाणारी स्थिती...
काल होतं ते आज नाही, उद्या माहित नाही
आत्ता जे आहे त्याची नाही कोणाही शाश्वती...
बालपणी शोभादर्शक यंत्रातील रम्य देखावा...
भाबड्या इवल्या जिवांना रमवून भुलवणारा...
एकटक बघतच राहायचो पापणीही न लवता...
मनोहारी रंगी-बेरंगी-आरशांचे असंख्य तुकडे...
क्षणोक्षणी रंग, आकार, रचना सर्व बदलणारे...
डोळ्यांना, मनाला तत्काळ भुरळच घालणारे...
तसाच जीवनात सुध्दा असणार, अदृष्य तराजू...
क्षणाक्षणास पारडं फिरवत रहातो प्रत्येक बाजू...
शेवटी सारीच मदार, कोण कितीसा आहे गरजू...
🌷@ तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply