कविता - 🌷 ' मंतरलेली मैत्री '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, ९ मे २०२४
वेळ - रात्री, ८ वाजून ३७ मि.
कधी दिसली शालेय गणवेशातील मुलं-मुली
आठवण होते, मंतरलेल्या शालेय जीवनाची
शाळा म्हणजे सहल-गॅदरिंग-बक्षिसं-मैत्रीणी
खेळ-स्पर्धा-झिम्मा-फुगडी-संगीत-नाचगाणी
एक वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन-आयोजन केलं
त्यात संगीत-नाटकाचं सादरीकरण ठरलं होतं
शाळेच्या गॅदरिंगचं नाटक होतं संगीत-शारदा
नाटकात मी झाले वल्लरी आणि शशी-शारदा
मी आणि शशी म्हणजे जिवाभावाच्या मैत्रीणी
भांडलो तरी फारवेळ दोघींना, करमायचं नाही
नाट्य-गीतांच्या तालमीला, धमालच उडायची
दर दिवशी तालीम, नवनवीन-व्यक्ति घ्यायची
नऊवारी साडीचा भला मोठ्ठा बोंगा सांभाळत,
जोडीला केसांचा दांडगा खोपा होता डोक्यावर
पार जुन्या काळातील जड दागदागिने मिरवीत
नाटकात गायचंही होतं शास्त्रीय-नाट्य-संगीत
त्यामुळे आम्हां दोघींना ती तारेवरची कसरत,
कशी जमवता आली हे त्या देवालाच माहित !
नाटक संपून टाळ्यांचा मोठा कडकडाट ऐकून
आम्हां दोघींनाही बिल्कुल खरंच वाटलं नव्हतं
म्हणून आम्ही एकमेकींना चक्क चिमटा काढून,
पडताळून पाहिलं की हे सर्व खरं आहे की स्वप्न
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply