कविता :🌷’ मंतरलेले दिवस ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, १ जुलै २०२३
वेळ : रात्रीचे ८ वाजून ५० मि.
आज मागे वळून पाहिलं तर,
उभं ठाकलं अवघं बाल-पण !
किती भाबडं-निष्पाप-जीवन !
निर्भेळ आनंदात क्षण-न्-क्षण
किरकोळ कारणांनी कट्टी-बट्टी,
दुसऱ्याच क्षणात जमायची गट्टी !
खूप आनंददायी अनपेक्षित सुट्टी
इवल्याशा निमित्ताने-गळा-मिठी
एकदा सहलीला गेलो असताना
पट्ट-मैत्रिणीशी कट्टी केली होती !
जेव्हा पावसाळी-चप्पल तुटली,
तिनं तिची-नवीन चप्पल दिली !
त्यामुळे कट्टीची लगेच बट्टी झाली
खोटा-राग जाऊन मैत्री घट्ट झाली !
तिच्या गोब-या-गाली आली लाली,
कायम-जीवाभावाची सखी झाली !
निमित्त होतं सहलीत-चप्पलेचं-तुटणं
रुसवा-फुगवा सोडून मैत्री घट्ट करणं
म्हणून महत्त्वाचं असतं संस्कार होणं
भाग्यानं लाभलं हे मंतरलेलं-बालपण !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply