कविता : 🌷’ मंगलमूर्ती ‘ कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ७ जून २०२३

कविता : 🌷’ मंगलमूर्ती ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, ७ जून २०२३
वेळ : १२ वाजून १४ मि.


कृष्ण-पक्षात येणारी चतुर्थी म्हणजे ‘संकष्ट’चतुर्थी
कठीण प्रसंगातून सुटका करणारी म्हणून ‘संकष्टी’
प्रथम पूज्य-गणेशाचं पूजन-वंदन आणि पुष्पवृष्टी 
उकडीच्या मोदकांच्या नैवेद्याने गणरायाची संतुष्टी

शुक्ल-पक्षातल्या चतुर्थीला म्हणतात ‘ विनायकी ‘
मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला म्हणतात ‘अंगारिकी’
दुःखापासून मुक्तीसाठी भक्त संकष्टीचं व्रत करतात
सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास-पूजा करतात !

सात्विक आहार-विचारांनी वाढतं आंतरिक मनोबळ
संकटांशी दोन हात करण्यासाठी, अंगी संचारतं बळ
मनाची अशांती-अस्वस्थता-असुरक्षितता काढती पळ
जीवनातील कूट-समस्याही मग आपसुक होती सरळ !

अत्यंत चतुर अन् कुशाग्र-बुद्धीचा गौरी-पुत्र-गजानन
हसत-हसत जिकलं त्यानं पृथ्वी-प्रदक्षिणेचं आव्हान
जरी निघाला मयूर-वाहनावर कार्तिकेय जलद-गतिने
शिव-पार्वतीला-प्रदक्षिणा घातली बुद्धिशाली गणेशाने !

महाकाय मंगलमूर्ती आरुढ होऊन मूषक वाहनावर
दूर करतो सगळी विघ्नं म्हणून आनंद पसरतो भूवर
प्रिय दुर्वांकुर व जास्वंदीची फुलं भक्त वाहती त्यावर
“मंगलमूर्ती मोरया”च्या जल्लोषात रमतो जन-सागर !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


























Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!