
कविता 🌷 " भुरळ "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
भुरळ घालते टिपूर चांदणे
चांदणी रात्र नसात भिनते...
खट्याळ चंद्रही खुणावतो
झाडांच्या मागून लुकलुकतो...
मंतरलेली रात, मनात तारे
आभाळातून गूढसे इशारे...
सुखद क्षणांचा आठव येता
जीव जडला, बघता-बघता...
मन अधांतरी गुंतून पडले
अलगद हिंदोळ्यावरी झुले...
चंचल मन भिरभिर फिरते
कधी उंचच उंच भरारी घेते...
अंतरीचे अल्लड भाव सारे
हळूच गाली गुलाब फुलले...
तन-मन प्रसन्न होतच जाते
जणू पंगतीला, सुखही येते...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply