कविता 🌷 ‘ भाव-विश्व ‘ तारिख – १२ जून २०१७


कविता – 🌷 ” भाव-विश्व “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
तारिख – सोमवार, १२ जून २०१७ 

ऊनं-पावसाचा हा खेळ चाले गं आयुष्यात, 
किती किती आठवांवं मनं हिंदोळे झोक्यात …

मना अनिवार ओढ, सुखावल्या त्या क्षणांची 
कशी विसरुन जाऊ खुण-न्-खुण सौभाग्याची 

सुदैवानं हाती लागलं काल-यंत्र एखाद्याच्या,
भुर्रकन् उडून पुन्हा रमेल विश्वात बालपणीच्या  

भाबंड्या गं त्या आठवणी, भाबडं ते लहानपणं  
भाबडं ते विश्वंच सारं, नको नको गं ते मोठ्ठं होणं  

मोठेपणी का गं होई, जग सगळं धूसंर धूसंर …
मोठेपणीचा बडेजाव, खोटा फुकाचाच गं धूर 

वय वाढता-वाढता विश्वाची कक्षाही विस्तारते …
पण भाव-विश्व संकोचून मनाची वाढ का खुंटते ?

बोथटं होती संवेदना, जाती थिजून भाव-भावना …
अशा गायब का गं होती, तरल-सुकुमार कल्पना

फुलं अन् फुल-पाखरं, सारं काही सुंदर-कोमलं 
हळुवार हळवं मनं, आठवेना केंव्हा कसं लोपलं …

संपताच बाल-विश्वं, सुरु होई स्वप्निल तारूण्य  
स्वप्नवत् भासे अवघी दुनिया, पूर्वजन्मीचं पुण्य 

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🌅
















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!