कविता – 🌷 ” भक्त आणि भगवन्त “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ६ डिसेंबर २०१६
भक्त जेव्हा संकटी …
धावून येई जगजेठी …
तुकोबा लिखीत अभंग …
त्यानं ठेविले “अ-भंग “!
स्वतः जळात लपून …
अभंग ठेविले जपून …
न दिले त्यांना भिजून …
सांभाळ केला कसून !
संत-जनांसाठी, झडकरी …
जळी-स्थळी- वास करी
अपार कष्ट करी मुरारी …
माय-बाप, कुंज-बिहारी …
घारीसारखे संपूर्ण लक्ष, भक्तांवर ठेवून …
सर्व संकटे वरच्यावरच अलगद झेलून …
भक्तांना सदैव सांभाळले …
त्यात जात-पात न पाहिले …
लहान-थोर भेदाभेद न केले …
रोहिदास भक्तासाठीच रंगविले चर्म …
मदत करण्या भक्तां, केले हरेक कर्म …
थोर ते भक्त, अन् महा-थोर भगवन्त …
सहज ओळखू येती, साधू आणि संत …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply