कविता - 🌷 ' भक्तिची किमया '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, ६ एप्रिल २०२४
वेळ - सायंकाळी, ७ वाजून २३ मि.
भक्त आणि भक्तिचा महिमा आहे अगम्य, अगाध,
जीवन भक्तिभावा-शिवाय जगणं-आहे मोठा प्रमाद ...
भक्ति मनात घर करते, त्या व्यक्तिला भक्त बनविते ...
आमूलाग्र बदलून त्याला, परोपकारी व्यक्ति घडविते ...
जेंव्हा मनातून कृतीत उतरुन आप-पर-भाव मिटवते,
ती व्यक्ति निरिच्छ-नि:स्वार्थ भावाने सेवा-कार्य करते ...
भक्ति अंतरी प्रकटून त्यास सद्कार्यास उद्युक्त करते,
तेंव्हा व्यक्तीच्या अंत:करणी "माणुसकी" तयार होते !
भक्ति लोकसंगीतात जेंव्हा शिरते, थेट मनाला भिडते ...
सर्व जन-सामान्यांच्या भाषेतील, भारुड बनून भावते !
ही भक्तिच "वा-नराचा" "नर," आणि त्यानंतर पुढे ...
"नराचा नारायण" पर्यंतचा प्रवासही, लीलया घडविते ...!!!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply