कविता : 🌷 ” बेशक मोहवणारे “


कविता : 🌷 " बेशक मोहवणारे "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

सळसळ, स्वप्नातल्या पाऊल-वाटेवरी...
जणू ती पानगळ, निपचीत पहुडलेली...

मनातील विचारांनी फुटले मधाचे-पोळे
सारे तरलतम संकेत, कुणी बरं धाडले ?

गत-जन्मीच्या स्मृतींनी दाटी केली सुंदर
जादूच्या कांडीची, जणू अवखळ फुंकर...

ढगांच्या-आडून सूर्याने डोळे मिचकावले,
सोन-कोवळ्या-उन्हात सचैल स्नान झाले...

ऋणानुबंध आठवून मन क्षणात बिलगले...
आपलं माणूस ओळखून तन-मन मोहरले

कूस बदलता ऋतूने, तत्क्षणीं सृष्टी बदलते
मनी हळूच कोवळी-कोवळी पालवी फुटते

रात्रीचे आकाश मुक्तपणे चांदणे पांघरलेले
पानोपानी दव-बिंदू अन् फुलांत फुलपाखरे

मुक्तपणे सरसरणारे पाण्यावरील ते काजवे
सुखद अनुभव सारे मनास बेशक मोहवणारे

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!