कविता – 🌷 ‘ बिंब ‘

कविता - 🌷 ' बिंब '
कवयित्री -तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २३ मार्च २०२४
वेळ -रात्री ९ वाजून ४५ मि.

मन हळवं-मृदु, होई मऊ मेणा-समान
मन कठोर-पाषाण, कठीण वज्रासमान

मन-नाजूक-भारी-जणू प्राजक्ताचं-फूल
मन सुगंधी-वेडंपिसं,जणू बकुळीचं फूल

मन-अंगार-वणवा, क्रोधाग्नीच-हा-तप्त
तना-मना-जाळीतो, राग-जो-गुप्त-सुप्त

मन-पाऊस-पाऊस, शितल-शिडकावा
रिम-झिम सरींनी मनी गाऊ लागे रावा

मन चांदण-चांदण चम-चम नभी करी
मन हिरवं-हिरवं, रान ताजं-तवानं करी

मन-हिंदोळा-हिंदोळा-उंच-उंच-आभाळी
मन चांदवा-चांदवा, शांतपणाने न्याहाळी

मन-आरसा-आरसा, विचारांचे प्रति-बिंब
जसे त्याला घडवू, तैसेच पडे त्याचे बिंब

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!