कविता : 🌷” प्रेम-दीप “

कविता : 🌷" प्रेम-दीप "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, १० जून २०२४
वेळ : दुपारी, १ वाजून २४ मि.

ओंजळ-भर पाण्याने आत्मा तृप्त होई
घोटभर पाण्यासाठी वणवण कशापायी

काळे ढग, पांढरे ढग कापूस पिंजून जाती
पावसापायी आसुसलेली पूर्ण मनुष्य-जाती

भेगाळलेली जमिन सांगते करूण-कहाणी
पाहता-क्षणी होईल काळजाचे पाणी-पाणी

हे ढग काय , ही विहीर काय ,
पूर्वीचा-आत्ताचा माणूस काय ...
संपूर्ण चराचरातून"ओलावा"च
आटून सु्कत चाललाय की काय !

"माती" आणि "नाती" यांतला सुप्त ओलावा,
आता तरी आपापल्यापरिने जपायलाच हवा...

अंतर्मनातील आप-पर-भाव, मिटायला हवा
पूर्ण चराचरासाठी प्रेम-दीप उजळायला हवा...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!