कविता - 🌷 " प्रेमाचे गहिरे रंग "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
लग्नानंतरचा तो मंतरलेला सुवर्ण काळ असतो...
सदैवच,
प्रत्येक मुलीच्या हृदयी, जणू कोरलेला असतो...
आयुष्यातील तो, पहिला-वहिला दिवाळ-सण...
अशक्य विसरणं,
पहिल्या पाडव्याचा, हवा-हवासा क्षण-न्-क्षण...
सर्व काही जणू, कालच घडल्यासारखं वाटतं...
नकळतच,
अंगा-अंगावरुन, आठवणींचं मोर-पीस फिरतं...
हलकेच सुगंधित तेल लावून, ते न्हाऊ घालणं...
सुखाच्या,
हळूवार स्पर्शाने जणु लज्जेची लालीमा पसरणं...
त्यावरुन सर्वांनी मिळूनच, थट्टा-मस्करी करणं...
मिश्किलपणाने,
सर्वांच्या हसण्याने, तिचं लाजूनच चूर चूर होणं...
आजही मधुर आठवणीत, तिचं मन रमून जातं...
प्रेमाच्या,
त्याच गहि-या रंगांमध्ये न्हाऊन, मन प्रसन्न होतं...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply