कविता – 🌷 ” प्रेमाची विलक्षण पातळी ” तारिख २५ डिसेंबर २०१६

कविता – 🌷 ” प्रेमाची विलक्षण पातळी “

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख २५ डिसेंबर २०१६

प्रेमाची नेमकी परिभाषा काय?
अगदी प्रि-टीन्सचा”फर्स्ट-क्रश” …
मग किशोर-वयीन लाजरं प्रेम …
बऱ्याचदा ते एक-तर्फीचं असतं …
मनातल्या मनात, गोड-आकर्षण …

कारण बोलून दाखवायची हिम्मत,
दोन्हीही पार्ट्यांकडे फार क्वचितच …
म्हणून डोळ्यांच्या भाषेची करामत …

त्यानंतर होतं, ऐन तारुण्यातलं प्रेम …
त्यात मुलंच घेतात पुढाकार, सप्रेम …
रूबाबातच विचारतात सर्वांचं क्षेम …

पहिले-पहिले, नुसते “शुभेच्छा संदेश”
मुलीनं, लाडिक हसून मान वेळावली …
जणू काही शुभेच्छा ऐकली-न-ऐकली …

मग एखाद-दुसरं सिझनल सुंदरसं फूल …
ते जर का स्वीकारलं गेलं म्हणत “थँक्यू” … 
तर संधी साधून छोटी प्रेमाची भेट-वस्तु …

अशी”हरी-झंडी” जर मिळाली तर,
प्रेमाची-गाडी धावू लागते, पटरीवर …
कधी ” ब्रेक “लागतो दोन्ही घरांतून …
तर कधी, ही गाडी गाठतेच जंक्शन …

मग संसार सुरु होतो, धूम-धडाक्यात …
प्रेमाचे चौकार, षटकार छान गाजतात …

एकदा”हनिमूनची-अँनिव्हर्सवरी”झाली,
की घरात पाळणा हलविण्याची तयारी …
मुलं-बाळं, बालवाडी, शाळा, कॉलेजादी …
यांत चांगलेच रमतात, संसारात दोघेही …

मूकपणे प्रेम, मात्र व्यक्तं होतं वेळो-वेळी …
मधूनच सुगंधी गजरा बघून, खुलते कळी …

प्रेम तेच पण परिपक्व होऊन त्याची पातळी,
सूक्ष्म-तरल-अत्युच्च-स्तराची-उंची-गाठलेली …
विलक्षण-मोहक-जादुभरी अशी असते झाली …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆







































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!