कविता- 🌷 ‘ पोच ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – सोमवार, ११ मार्च २०२४
वेळ – संध्याकाळी, ५ वाजून ११ मि.
कित्येकदा अनवधानाने चुका होतात …
कधी दुर्लक्ष केल्याने, बेफिकीर वृत्तीने
तर कधीकधी चिडून, लागट बोलण्याने
बोलणारा बोलतो पण वर्मी घाव होतात …
मुळात आपल्या वागण्यावर, वाणीवर
ताबा सुटल्याने असे अपघात घडतात …
हे जर दुसरा कोणी वागला असता तर ?
इतरांसाठी मात्र वेगळे नियम असतात …
बालपणी लहान म्हणून, माफ करतात …
किशोरावस्थेत’अर्धवट’ म्हणून सोडतात …
पण मोठेपणी सुध्दा जो वागेल बेदरकार,
त्या गोष्टीला मात्र माफी नाहीच सरकार !
थोडक्यात काय तर
विचार हवा, वागण्या-बोलण्या आधीच …
हातून बाण सुटाण्याआधी सावरणं हवं !
फार सोपं असतं, मित्राला शत्रू बनवणं …
पण शत्रू पुन्हा मित्र बनणं, कर्म-कठीण …
दुसऱ्याकडून जी अपेक्षा वागण्याबद्दलची
तीच वागण्याची पद्धत अवलंबवायला हवी
मैत्रीतील जुजबी वाद, लगेच मिटायला हवे
किरकोळ बाबींचं स्तोम माजवता कामा नये
झालं गेलं पार विसरुन, आनंद द्यावा-घ्यावा …
त्यासाठी ” नीर-क्षीर-विवेक ” मुळातच हवा …
प्रत्येक क्षण-न्-क्षण भरभरुन जगायला हवा …
जीवनात पूर्ण समतोल ठेवण्याचा, पोच हवा …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply