कविता : 🌷’ पोकळी ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शुक्रवार, १७ मार्च २०२३
वेळ : दुपारी, ३ वाजून ३९ मि.
मन हे प्रयोगशाळा
कुणी ही यावं प्रेम करावं
जो तो प्रितीचा भुकेला ll धृ ll
ज्याची त्याची मनं निराळी
मनामधली भकास पोकळी
वरवर हसून तो जगला तरीही,
जो तो एक-अकेला ll १ ll
जो तो स्वतः, मनीचा राजा
विहिरीतूनच बघतोय जगा,
डराव-डराव करुन थकता,
दोष तो देईल स्व-नशिबाला ll २ ll
नक्की न कळलं, काय करावं ?
कुणाला कसं हे बरं सांगावं ?
सहचराला कसं ओळखावं ?
जो तो गुरफटलेला ll ३ ll
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply