
कविता : 🌷" पुन्हा पुन्हा "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
नको छेडू पुन्हा पुन्हा,
डोहातल्या चांदण्याला...
खेळवू नको पुन्हा पुन्हा,
वेड्या-खुळ्या मनाला...
नको जोजवू पुन्हा पुन्हा,
त्या हळव्या आठवणींना...
जागवू नको पुन्हा पुन्हा,
त्या लांब-लचक रात्रींना...
नको दुखवू पुन्हा पुन्हा,
त्या कोवळ्या भावनांना...
फसवू नको पुन्हा पुन्हा,
स्वतःला अन् जगताला...
नको आठवू पुन्हा पुन्हा,
त्या आसुसलेल्या मनाला...
रिझवू नको पुन्हा पुन्हा,
त्या समस्त प्रेमी हृदयांना...
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply