कविता -🌷 ” पुनरागमनाय च “

कविता -🌷 " पुनरागमनाय च ".
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

गौराई ही समृद्धीची-भाग्याची-धान्याची देवता
ज्येष्ठा-गौरी-व्रताने-अखंड सौभाग्याची-पूर्तता
गौरी-गणपतीचा सण पूर्ण कुटुंबास बांधणारा,
रक्ताच्या नात्यांना अधिकच जवळ आणणारा,

हा सण-उत्साही-आनंदी वातावरण निर्मिणारा
भक्तांचे कौटुंबीक ऋणानुबंध, दृढही करणारा
घरी पाहुण्यांची वर्दळ बाळ-गोपाळांची धमाल
पूर्वजांच्या स्मरणातील गप्पांची रंगतही कमाल

नाचत-गात-झिम्मा-फुगड्या-खेळतच-जागरणं
सासर-माहेरच्या मंडळींनी एकत्र येऊन-जमणं
गौरी-पूजनाच्या, पारंपारिक रितीभाती-पध्दती
ज्येष्ठागौरी-व्रत-माध्यमातून स्त्री जपते संस्कृती

मुक्याने पाणवठ्याहून प्रतीक-पाच-खडे आणून
त्यांचे गौरी म्हणून करती पूजन-अर्चन-आवाहन
कुणी उभ्या गौरी आणून त्यांना सजवून पूजतात
घरात गौरीची आठ-पाऊले, रांगोळीने रेखाटतात

घरी आल्यावर प्रत्येक पाऊली क्षणभर थांबतात
गौरी आसनस्थ होत, गृहपदी-विराजमान होतात
गौरी-पूजेत नाना-फुलां-पानांची-आरास करतात
देवी-सवाष्णीं-कुमारींना शेवंतीची वेणी माळतात

फुलांचे हार-चाफा फूल, केवड्याचे पानही अर्पण
गौराईच्या स्थापनेनंतर, महा-लक्ष्मीची पूजा संपन्न
नानाविध पदार्थ-महानैवेद्यास-पुरणावरणाचा घाट
पुरणाच्या दिव्यांनी आरती, हळदी कुंकवाचा थाट

रात्री झिम्माफुगड्या-नृत्य-भेंड्यांनी, गौर जागवतात
खीर-कानवले-दहीभाताचा-नैवेद्य, गौरी-विसर्जनास
विसर्जनाची-नदीकाठची-माती घरी आणण्याची प्रथा
"पुनरागमनाय-च"-हीच-प्रार्थना,चरणी-टेकवूनी-माथा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!