कविता – 🌷 “पुनः पुन्हा जन्मा, येणे नाही” तारिख – ३ ऑक्टोबर २०१६
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
मनं हे प्राजक्त …
होऊनी विरक्त,
पुनरपि ” रत ” …
होणे नाही ……
मनं हे अबोली …
वाहिलं ते पायी …
पुनरपि ” कायी ” …
येणे नाही ……
अर्पूनी कमळ …🌷
भाव हा निर्मळ …
पुनरपि ” पाशी “…
गुंतंणे नाही ……
मनं हे जास्वंदी …🌺
अर्पिले तव-पदी …
संपू दे, आसक्ती …
आता तरी ……
मनं हे ” अनंत ” …
भाव असे शांत …
नको ” येरझारा ” …
देवा आता ……
मनं हे चमेली …
मी चरण-धुली …
नको मोह-जाली …
गुंगणे आता ……
मनं हा केवडा …
भाव हा भाबडा …
पुनरपि ” विषयी ” …
रमणे नाही ……
वाहुनी चंपक …
भाव हा सम्यकं …
पुन्हा इहलोकी …
येणे नाही ……
मनं हे बकुळ …
भाव हा निर्मळ …
पुनरपि ” फिरुनी ”
येणे नाही ……
मनं हे सायली …
चरणी वाहिली …
कृपेची साऊली …
द्यावी आता ……
मनं हे तगर …
आनंद-सागर …
नैय्या करी पार …
झणी आता ……
मनं हे कर्दळ …
भाव तो सोज्वळ …
पुनः-पुनः जन्मा …
येणे नाही …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply