कविता – 🌷 ” पुतळे “

कविता - 🌷 " पुतळे "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २२ ऑक्टोबर २०१६

आज काय करावं तेच काही कळेना ...
असं वाटलं,शब्द-ब्रह्म जणू सापडेना ...
विषय कैक पण नेमका समोर येईना,
शांत-निश्चळ मन जणू समाधी सोडेना ...

कधी-कधी जेंव्हा असं होतं, ...
क्षणात सर्वकाही स्तब्ध होतं ...
विश्राम करण्यासाठी पळभर, ...
जणू वेळही थांबतो, क्षणभर ...

बाकी विश्व सर्वच्या सर्व पळतंय ...
वाघ पाठी पडल्यागत, धावतंय ...
प्रत्येक मन कशात तरी गुंतलंय ...
मोहाचं-जाळं सर्वांस वेडं करतंय ...

घड्याळ्याच्या काट्यांवरती ...
समीकरणं अवलंबून असती ...
जर घड्याळंच बंद पडलं तर ...
सगळे पुतळेच, बनतील बरं ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!