कविता -🌷 ” पालुपद “

कविता -🌷 " पालुपद "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, ७ सप्टेंबर २०१७

हल्ली माणसं ऐन तरुण-पणी,
भासतात,थोडी म्हाताऱ्यावाणी

सुग्रास अन्नापेक्षा करती जास्तं,
औषधगोळ्याचूर्ण खाऊन फस्तं

अधून-मधून तपासण्या करतात
पण एरवी स्वस्थ बसून राहतात

नेमानं योगप्राणायाम केला नित्यं,
प्रत्येकजण नक्की होईल रोगमुक्त

आपलं आरोग्य हवं असेल उत्तम,
सदा हवा उत्साह-जोम, सर्वोत्तम

प्राणायाम वमन व शंख-प्रक्षालन
निगुतीने घ्यायला हवं नीट शिकून

शरीर-शुद्धीकरणाच्या नाना क्रिया,
नित्य नेमाने अचूक करायला हव्या

नाहीतर, अपचन,जळजळ,अनिद्रा
मग कधीच सोडणार नाहीत पिच्छा

जो पर्यंत योगाभ्यास करण्यासाठी,
साधक वेळात वेळ काढणार नाही,

हे दुखतंय-ते खुपतंय, अशी तक्रार
रडतराऊ रडवेलं पालुपद लावणार

दिवस-रात्र रडत-कुढंत घालवणार
निष्क्रीय शरिर तग कसं हो धरणार ?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!