कविता :🌷’ पाऊस असा पडावा ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, १ जुलै २०२३
वेळ : दुपारचे २ वाजून ०१ मि.
वाटलं रमत-गमत मस्त जावं फिरायला
नट्टा-पट्टा करुन लगेच निघालो जायला,
हसत-खिदळतच अवघा ताफा निघाला
एवढ्यात थंड-गार-सुसाट वारा सुटला !
अचानक सृष्टीचा नक्षाच पार बदलला,
आभाळात काळ्या ढगांनी फेर धरला,
हे पाहून मग सूर्यानेही गाशा-गुंडाळला !
चक्क त्यांच्या मागेच जाऊन तो लपला !
वळवाच्या-पावसाचा हा राग-रंग बघता,
सर्वांनी वळचणीलाच आडोसा घेतलेला
टपरीवरच्या कांदा-भज्यांचा फन्ना केला !
वाफाळत्या-चहाचा आस्वादही घेतलेला !
खात-पीत गप्पा-टप्पांना ऊतच आलेला,
बाहेर पाऊसही होताच स्पर्धा करायला !
वेळ कसा कापरा-सारखा उडून गेलेला,
भानावर आलो तेव्हा पाऊस थबकलेला !
सर्वांनी मग गप्पा व हात आवरता घेतला
जड अंतःकरणाने काढता पाय घेतलेला !
चाललो नसलो तरी मनाचा-तजेला वाढला
वळवाचा हा पाऊस पक्का लक्षात राहीला !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply