कविता - 🌷 " पहाट "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
ऋतु वसंत हळूच आला...
फुलांचा सुगंध दरवळला...
दारातच बहरला बहावा...
प्रसन्नतेचा होत शिडकावा...
आला फुलून निशिगंध...
निशाही गंधमय झाली...
ती पहाट सुंदर ओली...
नकळत मनेही मोहरली...
रात्रीचा शांत शांत प्रहर...
रातराणीचा धुंद दरवळ...
प्रीतीचा आतूर परिमळ...
जणू कमळामध्ये भ्रमर...
आभाळातून चंद्र खुणावे...
त्यास पाहून जीव वेडावे...
रात अशी ती चंद्राळलेली...
मूक वचनांनी चिंब भिजली...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply