कविता – 🌷 ” परिणीती आणि फलश्रुती ” २९ डिसेंबर २०१६

कविता – 🌷 ” परिणीती आणि फलश्रुती “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २९ डिसेंबर २०१६

मुंबईत जसे गल्लो- गल्ली पान-वाले,
तसे घरी येऊन देणारे,अंडी-पाववाले …
सायकलची घंटा किण-किण-वाजवंत,
दिवसांतून किमान चार-पाच वेळा येत

सोसायटीत चक्कर,त्यांच्या पोतडीत,
अठरा- पगड गोष्टींचा भरणा घेऊन,
तमाम गृहिणीना खूप खुश करतात 

अगदी ” चना-जोर गरम “पासून,अंड्यांपर्यंत,
” सब-कुछ-अंडर- वन- रूफ “जादूनं मिळतं …

हल्ली,” राजू ” नावाचा हसरा चेहरा,
अंडी-पाव घेऊन सोसायटीत यायचा … 

त्याचा प्रसन्न चेहरा छानच वाटायचा …
“भोनी करो”म्हणून पिच्छा,पूरवायचा …

“आपके हाथ लगनेसें सारा माल, फटाफट होता है खत्म”, म्हणत …
प्रत्येकास जणू हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा …
एवढ्या लहान वयात,”मार्केटिंग स्किल”दाखवायचा …

घरी पाव- भाजीचा होता बेत, म्हणून त्याला आधीच सांगून
जास्तीचे “लादी-पाव” मागवून, मग सुटकेचा निःश्वास टाकला 
दुसऱ्या दिवशी सकाळी, बेल मारून दरवाज्यात उभा राहिला …

दरवाजा उघडताच,नेहमीचा हसरा चेहरा, होता लांब-लचक झालेला 
प्रश्न विचारला तरी,तो गप्पच बसला, निरखून पाहिलं तर डोळे ओलसर 
“क्या हुआ,बता तो जरा “म्हटलं तर, त्याचा अंड्यांचा- ट्रे, रस्त्यात पडून,
अंडी फुटून,खूप नुकसान झालेलं, नुकताच धंदा सुरु केला होता त्यानं

१५/१६ वर्षांचं त्याचं कोवळं वय, “कितना घाटा हुवा”जेव्हा विचारलं,
दुकानदाराने माल देणंच बंद केलंय, हे समजल्यावर ओळखीच्या,
ठोकभावात अंडी-विक्री-दुकानदाराला चिठ्ठी लिहून, पाठवलं त्याला 
दुकानातुन फोन आल्यावर, त्याचं काम झालं 

दुकान-दाराची खात्री पटली, त्यानं “क्रेडिट”वर अंडी दिली,
तेव्हा कुठे राजुची कळी मग परत, खुलली …

त्याच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं, दिलखुलास “हास्य” पाहून,
उगीचच मला खूप बरं वाटलं, तसं पाहिलं, तर एक शब्द,
टाकण्या पलीकडे, फारसं असं काहीच केलं नव्हतं …

त्याची लगेच,इतकी छान परिणीती …
काहीही विशेष न करताही,फलश्रुती …
ही ” खुषी ” मात्र काही औरच होती …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆














Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!