कविता -🌷 ” परमानंदात खरं-जगणं “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख -४ डिसेंबर २०१६
नेमेची येतो मग पावसाळा …तसा, नेमेची येतो वाढ-दिवस …
दर-वर्षी साजरा होतो वाढ-दिवस-अगदी जन्मल्यापासूनच !
पहिल्या महिन्या पासूनचीच प्रथा …घरापुरता साजरा दर महिन्याला
यात आई-बाबा, आजी-आजोबा, यांचाच उत्साह असतो महादांडगा …
पहिल्या वर्षाला मात्र तो होतो दणक्यात …
इथून पुढे बाळाला समजते त्यातली गंमत …
दरवर्षी उत्सवमूर्तीचं, वाट बघणं सुरु होतं …
हळूहळू त्याला, शिंगंही फुटायला लागतात …
वयानुसार मागण्या सुद्धा वाढायला लागतात …
अन् दरवर्षी त्या चढत्या-क्रमातच असतात …!
तरीही वाढ-दिवस नक्की साजरा होतो …
कधी-खूप उत्साहात-धूमधडाक्यात …
तर कधी कधी काहीसा थोडक्यात …
तरीही वेळ कसा जातो नाही समजत,
धमाल दंगा-मस्ती, हसण्या-खिदळण्यात …
भुर्रकन उडतो आनंदात-गप्पा-टप्पात …
वास्तविक पाहता, वाढतच असतो आपण …
जन्मल्यापासून प्रत्येक क्षणा-क्षणाला …
जर एक वर्ष पूर्ण करणं हा “मैलाचा-दगड” मानला,
तर वाढ-दिवस साजरा होणं योग्यंच, दर-वर्षाला !
तसं पाहिलं तर, आपण नुसतं वयानंच नाही वाढत …
विचारांनीही वाढतो-वयाबरोबर विचार सुद्धा होतात परीपक्वं !
नुसतं वयानं वाढून चालणार नाही…कृतीतूनही वाढायला हवं …
फक्तं स्वतःसाठीच न जगता, इतरांसाठीही जगून बघायला हवं …
“दुसरा” हा खरोखरचा “दूजा” नसून, आपलंच एक”विस्तारित-स्वरूप “!
हा विचार पक्का रूजला की गोष्टी सोप्या होऊन संचारतो नवा-हुरूप …
दुसऱ्यात” स्वतःला ” ज्या क्षणाला, पाहता आलं …
त्या-क्षणाला परम-आनंदात खरं-जगणं सुरु झालं …
जणू याची-देही-याची-डोळा, “सत-चित्-आनंद-पर्व ” सुरु झालं !
जणू याची-देही-याची-डोळा, “सत-चित्-आनंद-पर्व ” सुरु झालं !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply