कविता : अविरत कालचक्र


कविता : अविरत कालचक्र
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

युगायुगांचं अविरत हे सृष्टीचं काल-चक्र
स्वार्थी-कृतघ्न मनुष्याचं वेगळंच दुष्ट-चक्र
कैक अक्षम्य अपराध केले निसर्गाविरुध्द, 
तरी ओंजळ-भरुन-लाभे-संपदा, निसर्गदत्त...

वसंत ऋतूच्या आगमनाने, नटतो निसर्ग
वृक्षवेलींना लालसर पालवीने येतो बहर... 
आंब्याच्या फांदी-फांदीवर फुलतो मोहोर
सण-वारांमुळे सदा-सर्वदाच आनंदी-प्रहर...

ग्रीष्मऋतूमध्ये वटपौर्णिमा-आषाढी-एकादशी
वड-पूजा, जणू एकरूपच होणं सृष्टी-देवतेशी...
आषाढीला भक्तांसाठी पंढरपूरी असते काशी 
विठ्ठल-रखुमाई-दर्शनाने जळती पापांच्या-राशी...

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!