कविता – 🌷 ” न लढताच सर केला जीवन-गड ” तारिख – २ सप्टेंबर २०१६

कविता – 🌷 ” न लढताच सर केला जीवन-गड “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २ सप्टेंबर २०१६

माता करीते सूक्ष्मतम संस्कार गर्भावर …
घटिका-पळे-दिस-मास जाती भराभर …
जीव जन्मतो नऊ मास पूर्ण झाल्यावर …
अभिमन्युपरि लेवून संस्कारांची झालर …

माता मग करीतसे नव-संस्कार त्या नवजीवावर …
वात्सल्याचे बोल करिती संस्कार त्या अर्भकावर…
हळूहळू सुसंस्कार घडत जाती सतत त्या बाळावर…
रात्रंदिवस सूक्ष्मातिसूक्ष्म पैलू पडत जाती हिऱ्यावर …
 
माता दररोज सांगे गोष्टी महान्-सद्गुणी-व्यक्तींच्या…
कान टवकारुन श्रवण करीतसे बाळ, तन्मयतेने त्या …
आपसूक संस्कार होई तेव्हा विविध प्रकारच्या गुणांचा…

गोष्टी संत-महंतांच्या, गोष्टी कर्तृत्वाच्या-अध्यात्माच्या…
गोष्टी राजा-महाराज्यांच्या, देशभक्तीच्या-रामायणाच्या…
गोष्टी महाभारताच्या निष्ठेच्या-चातुर्याच्या अन् विरतेच्या…

जिजाऊंनी जन्म देऊन, कणाकणांनी घडवलं शिवबाला…
ऐकून गोष्टी-धैर्याच्या-शौर्याच्या-धाडसाच्या अंतर्मुख झाला…
अन्यायाच्या, अन्याय-कर्त्यांच्या विरुद्ध पुरता पेटून उठला…
मनोमनी तेव्हाच, गो-ब्राह्मण-प्रतिपालकाचा निश्चय झाला…

ऐकून पराक्रमाच्या गौरवगाथा, घडवू शकला स्वजीवन-गाथा…
जमवून लहानथोर मावळ्यांचा जथ्था, रचली देशाची वीरगाथा…
तोडच नाही जिजाऊंच्या अविरत-अपार कष्टांना-व परिश्रमांना… 
अन् गुरु समर्थ रामदासांच्या अर्थपूर्ण मार्गदर्शक आशिर्वचनांना…

दोहोंच्या मार्गदर्शनानं सिंहासनारूढ-शिवबा, शिव-छत्रपति झाला…
अवघ्या भरत-भूच्या जनमानसी कायम-स्वरुपी विराजमान झाला…

न भूतो न भविष्यती असा, अमर इतिहास रचला गेला…
“न-लढताच जिजाबाईंनी, जीवनाचा-गड ” सर केला…

आजची ही कविता लिहीत-असताना, 
ऊर अभिमानाने-देशप्रेमाने भरुन आला …
कोटी-कोटी प्रणाम त्या थोर माऊलीला …
कोटी-कोटी मुजरा त्या शूरवीर शिवबाला…

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!