कविता : 🌷 " न भूतो न भविष्यति " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
त्याकाळी मुघल शासकांच्या जाचाने रयतेची गेलेली रया अत्याचारांच्या भीतीने घराबाहेर पडत नव्हत्या आयाबाया... घालीत होत्या देवाला साकडं, "आता ये, कर बाप्पा दया"...
शिवनेरी किल्ल्यावर आनंदोत्सवाची झाली आतिशबाजी... देवी शिवाईच्या कृपेमुळे म्हणून पुत्राचं नाव ठेवलं शिवाजी ! जिजाऊंनी शिवरायांवर केलेल्या संस्कारांनी मारली बाजी...
बालपणी-शिवाजी मावळ्यांचा नेता बनून किल्ला करी सर... पुढे प्रत्यक्षात शर्थीने लढून अनेक किल्ले केले त्यांनीच सर... म्हणतात ना, "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"अगदी खरं...
'तोरणा' जिंकून मराठा-साम्राज्य-मुहूर्तमेढ भक्कम रोवली... मुघल शासकीय अघोरी अन्यायांतून जनतेची सुटका केली... निडरपणे कावेबाज शाहिस्तेखानाची बोटंच छाटून टाकली...
पन्नास वर्षांच्या आयुष्यात "न भूतो न भविष्यति"-कार्यसिद्धी... "नभात सूर्य-चंद्र-तारे" तोवर महाराजांची-अपार-अनंत-किर्ती... भावी-पिढ्या कायम गातील-शूर-शिवाजी महाराजांची-महती...
Leave a Reply