कविता – 🌷 ” निसर्ग-देवते तुज त्रिवार-वंदन “

कविता - 🌷 " निसर्ग-देवते तुज त्रिवार-वंदन "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

खरंतर वेळ आलीय माणसाने जागे व्हावे आता
जरी शत-शत-लक्ष हातांनी सतत देतो, तो दाता ...
त्या वररदानांचा मान वेळीच ठेवता यायला हवा ...
तरच भविष्यातही निभाव लागू शकेल मानवाचा ...

अन्यथा भविष्यात जेव्हा निसर्गाचा होईल कोप,
तेंव्हा पार आटून जातील, पाण्याचे सारेच स्रोत ...
मग पश्च्चात्ताप झाला तरी काय त्याचा उपयोग ?
पाण्याविना प्राणी-जीवित-वित्त-हानीच होईल खूप ...

म्हणून थेंब-न्-थेंब वापरूया आपण जपून-जपून ...
सृष्टीदेवतेच्या आजवरच्या दानतेचा सन्मान करुन
सजीव प्राणीमात्रांसाठी, पाणी हेच खरे "जीवन" ...
हे जीवनदायिनी निसर्ग-देवते, तुजला त्रिवार-वंदन ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!