कविता – 🌷 ” निसर्ग-जीवन-चक्र “


कविता - 🌷 " निसर्ग-जीवन-चक्र "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

एका-पाठोपाठच ८४ लक्ष वेळा जन्म-मृत्यूचा फेरा...
सर्व भोग भोगून झाल्यावरी, मिळे जन्म मनुजावरा...

क्षण-भंगुर असं जीवन जगणं मिळतसे फुलपाखरा...
छोटंसंच स्वच्छंदी पण कष्टप्रद-जगणं मिळे पक्षीवरा...

पृथ्वीतलावर प्राणी असती विविध आकार- प्रकारांचे...
पण प्रत्येकाचे जीवन-ध्येय-एकच, शिकार साधण्याचे...

छोट्या प्राण्याची शिकार करण्यासाठी मोठा टिपलेला...
मोठा गाफील असता, त्याचं भक्षण करी-त्याहून-मोठा...

सरसकट लहान प्राणी खाद्य बनतात मोठ्या प्राण्यांचे...
मोठे होतात "भोजन",त्यांच्यापेक्षा शक्तिशाली प्राण्यांचे...

जन्मलेल्या जीवांनी, आपापले इति-कर्तव्य बजावायचे...
कायम निसर्ग-जीवन-चक्र असेच पुढे जात राहावयाचे...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!