कविता 🌷 ‘ निसर्गाची जादू ‘. तारिख – २३ में २०१७

कविता – 🌷 ” निसर्गाची जादू “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
तारिख – मंगळवार, २३ मे २०१७ 
कधी कधी अस्मादिकाना, उगीचच
मोरपिसा-सारखं, खूप हलकंं वाटतं …

विचारांच्या उंच-भव्य हिंदोळ्या-वर,
मनसोक्त झोके घेत घेत रमावंं वाटतं …

तसं काहीच कारण नसताना, वाटतं,
उत्स्फूर्तपणे उठून नाचावं-गात बसावं …

समुद्र-किनारी मखमली शुभ्र रेतीत,
अंगावर कोवळी उन्हं पांघरुन सुस्तीत …

मस्त अंग शेकत-लोळत-पडावं वाटतं …
सतत उसळणार्या-त्या फेसाळ-लाटांकडे,
भान हरपून, बस्स पहात राहावं एकटक …

सागराच्या अति-विशाल-अथांग देहावर,
अलगद पसरणार्या सोनेरी रवि-किरणांचं,
अगदी मनापासून, कौतुक करावं वाटतं …

नदिच्या नागमोडी, मोहक वळणांवरून,
जीव ओवाळून वाटतं, पहावं तसं जगून …

हिमालयाच्या शुभ्रं अत्युच्च-शिखरी जाऊन,
घोर-तप-साधना करावी-आसनमांडी घालून …

न चुकता-दररोज नित्य-नियमानं उगवणार्या
पूर्ण विश्व पाप-क्षालन करुन, शुद्ध करणार्या …

त्या तेजोमय सूर्याला न्याहाळावं मावळताना …
सागर-जलात उभं राहून यथार्थ अर्घ्य देताना …

मावळत्या किरणांनी निर्मित दिव्य “कँनव्हास” …
लालिमेच्या अक्षरशः लाखों रंग-छटांनी युक्त …
क्षणोक्षणी बदलत राहून, मनास करी आसक्त …
निसर्गाची जादू विस्फारित नजरेनं आकंठ पिऊन
वाटतं, हृदय-पटलावर कायमचीच ठेवावी कोरून … 
🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!