कविता : 🌷 " निसर्गदत्त "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
कॅलेंडरची पाने पालटत राहतात वर्षा मागून वर्षं सरतात,
ॠतु मागून ॠतु मात्र आपापली कामं, चोख बजावतात...
पानगळीत पूर्णत: निष्पर्ण झालेली झाडं पुन्हा बहरतात...
वसंत-ॠतुच्या चाहूलीनं पुन्हा एकदा मोहरुन निखरतात...
पाना-फुलांनी-कळ्यांनी डवरुन अत्यानंदे, डोलू लागतात...
प्रेमानं आसरा देऊन पक्षांची घरटी-व पिल्लं सांभाळतात...
सुसाट वा-या-पावसात-सगळे प्राणी निवा-याला धावतात...
रणरणत्या उन्हात शीतल सावलीत सर्वांना विसावा देतात...
युगानु-युगं रहाटगाडग्या-सम चालू आहे हाच निसर्ग-क्रम...
श्रेयाचे मानकरी निसर्गदत्त शिस्तबद्धतेचे अविरत परिश्रम
सृष्टिच्या रचनेस, १ अरब, ९७ कोटी ४० लाख वर्षं झाली
अखंड-अविरत चालू आहे हाच अलिखित-नियम अजूनही
सर्वोच्च मानाचा त्रिवार मुजरा, काटेकोर नियम-बद्धतेला...
कोटि-कोटि प्रणाम त्या चराचरात-स्थित, निसर्ग-देवतेला...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply